उड्डाण पुलावरील संरक्षक भिंतीवर जाळी बसवा अन्यथा आंदोलन -संभाजी कदम.
अहमदनगर उड्डाणपूल सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.अहमदनगर उड्डाणपूल येथे मंगळवारी अपघात होऊन संकेत डोळे या तरुणाचा भिंतीवरून खाली पडून मृत्यू झाला. उड्डाण पुलावरील धोकादायक वळण हे त्यास कारणीभूत ठरले.
सदर घटना घडल्यामुळे उड्डाणपुलावरील संरक्षक भिंतीवर पाच फूट लोखंडी जाळील लावावी अशी मागणी शिवसेनेचे नेते संभाजी कदम यांनी केली आहे. तरी सदर पुलावर लोखंडी जाळी एक महिन्याच्या आत बसवण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी कदम यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे दिला आहे.
सदर घडलेल्या घटनेस सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे तरी सदर युवकाच्या नातेवाईकाला पाच लाख रुपये मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.....Read more
Comments
Post a Comment