श्रीसेवकांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी, खारघर दुर्घटनेत ५० हून अधिक मृत्यू: संजय राऊत
खा.संजय राऊत यांचे शिंदे सरकारवर खारघर दुर्घटनेमध्ये आरोप.
श्रीसेवकांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी, खारघर दुर्घटनेत ५० हून अधिक मृत्यू: संजय राऊत
मुंबई:
खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मृत्यू झालेल्या श्री सेवकांचे शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी श्रीसेवकांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टचा दाखला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार, या श्रीसेवकांच्या पोटात जवळपास सात ते आठ तास अन्नपाणी नव्हते. ही बाब अहवालात स्पष्ट झाली आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यात हे श्रीसेवक पाण्यावाचून तडफडून मेले, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य सरकारकडून खारघर दुर्घटनेतील मृतांचा खरा आकडा लपवला जात आहे. आतापर्यंतच्या अधिकृत माहितीनुसार खारघर दुर्घटनेत उष्माघातामुळे १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, माझ्या माहितीनुसार खारघर दुर्घटनेतील मृतांचा किमान आकडा ५० आणि कमाल आकडा ७५ इतका आहे. पालघरमधील साधूंच्या हत्याकांडावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते चार दिवस डहाणूमध्ये ठाण मांडून बसले होते. तेच देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते ५० श्री सेवकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना भेटायला गेले नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात श्री सेवकांविषयी सहानुभूती दिसली नाही. खोके सरकारचे लोक मृत श्री सेवकांच्या घरी जाऊन त्यांना पैसे देऊन गप्प बसायला सांगत आहेत, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.
श्रीसेवकांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी, खारघर दुर्घटनेत ५० हून अधिक मृत्यू: संजय राऊत
खारघर दुर्घटनेतील मृत श्रीसेवकांचे शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी श्रीसेवकांचा पाण्यावाचून तडफडून मृत्यू झाल्याचा आरोप केला.
मृत श्रीसेवकांच्या पोटात सात-आठ तास अन्नपाणी नव्हते रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती.'खोके सरकारचे लोक मृत श्री सेवकांच्या घरी जाऊन त्यांना पैसे देऊन गप्प बसायला सांगत आहेत'.....Read More

Comments
Post a Comment