नेवासा तालुक्यातील २ री घटना वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू.
अहमदनगर:-
अहमदनगर मधील नेवासा तालुक्यातील २ री घटना मागील ४ दिवसा पूर्वी वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना नेवासा येथील म्हसले गावामध्ये घडली आहे.
सदर घटना २८ एप्रिल २०२३ रोजी १२:१५ मिनिटाचा सुमारास घडली आहे. मुलाचे नाव साई ऊर्फ बहिरूनाथ राजेंद्र शिरसाठ असे आहे. सदर मुलाचे वय हे १० वर्ष असून तो इयत्ता ४ थी मध्ये शिकत होता.
शुक्रवारी सकाळी ११:३० ते १२:३० या दरम्यान वादळी वाऱ्यासह, विजेचा कडकडाटसह अवकाळी पाऊस झाला आहे. हा मुलगा शेतकऱ्याचा असून शेतात कांदे काढून ठेवलेले होते, ते झाकण्यासाठी त्याचा कुटुंबासोबत शेतात गेला होता. त्याचा सोबत यावेळी त्याचे आई आणि वडील सोबत होते. कांदे झाकत असतानाच वीज कडाडली आणि त्यानंतर २० सेकंदात ती खाली कोसळली गेली. आणि त्यामध्ये त्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यावेळी विजेचा शॉक बसून आणि आवाज एकून संपूर्ण जमीन हादरून गेली होती, असे या परिसरातील लोकांनी सांगितले आहे. तसेच त्याचा कुटुंबियांकडून ही माहिती सांगण्यात आली आहे.
सदर मुलाचा मृत देह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला होता. या परिसरातील ही दुसरी घटना घडली आहे. या परिसरात या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त करत आहेत.
वीज पडणे ही नैसर्गिक घटना जगभरात सर्वत्र होत असते. जगभरात तसेच भारतात देखील वीज पडून मृत्यू चे प्रमाण जास्त आहे. वीज पडण्यापूर्वी जेव्हा वातावरण निर्मित होत असते, अशा वेळी जर सुरक्षिततेचा माहितीचे पालन केले तर अशा घटनांमुळे होणाऱ्या जीवित व वित्तहानी चे रक्षण करता येऊ शकते......Read more

Comments
Post a Comment