युवा सेनेच्या विस्तारक शर्मिला येवले यांचा कडून पुणे म्हाडा मंडळ आणि कंत्राटदार यांचा समोर आत्मदहन करण्याचा इशारा.
युवा सेनेच्या विस्तारक शर्मिला येवले यांचा कडून पुणे म्हाडा मंडळ आणि कंत्राटदार यांचा समोर आत्मदहन करण्याचा इशारा.
गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे:-
म्हाडाकडून आणि कंत्राट दिलेल्या कंपनीकडून वारंवार २०२३ ची सोडत कशी पारदर्शक आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो आहे. परंतु वास्तविक पाहता असे काहीही दिसत नाही.
२० मार्च २०२३ रोजी म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत जाहीर करण्यात आली होती. पण या सोडतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रारिक त्रुटी होत्या हे वारंवार पुणे मंडळ आणि कंपनीच्या लक्षात आणून देऊन सुद्धा यावर काम न करता नागरिकांची फसवणूक केली गेली आहे आणि या पुढेही आणखी फसवणूक करण्याचे काम चालूच आहे. यावेळी त्यांनी म्हाडासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये पहिला प्रश्न हा उपस्थित केला आहे. आधीच सॉफ्टवेअर असताना नवीन सॉफ्टवेअरचा घाट कशासाठी, जर आधीच सॉफ्टवेअर योग्य होते, तर त्यात सुधारणा करून देखील लॉटरी काढता आली असती. परंतु म्हाडा पुणे मंडळाकडे पैसे जास्त झाल्यामुळे त्यांनी नवीन कंपनीला कंत्राट देत पारदर्शकतेचा ढोल वाजवला आहे असे ही त्या यावेळी बोलल्या आहेत.
नवीन सॉफ्टवेअर वास्तवात अस काही झाले नाही, मी स्वतः देखील फॉर्म भरत असताना मला असंख्य अडचणी फॉर्म भरताना आल्या आहेत. आणि त्यानंतर त्याच्या पात्र विजेत्यांच्या तक्रारी देखील आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे सदर कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्यात यावं आणि २०२३ ची सोडत पूर्णतः रद्द करण्यात यावी तसेच या कंपनीकडे कोकण मंडळ, औरंगाबाद, मुंबई ह्या विभागांच्या लॉटरीचा देखील कंत्राट दिलेले आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे ह्या कंपनीकडून हे सर्व कंत्राट काढून घेण्यात यावं आणि ही कंपनी ब्लॅकलिस्ट करण्यात यावी अशी त्यांनी यावेळी मागणी केली आहे. जर असं केलं नाही तर सोमवारी पुणे मंडळाच्या समोर आम्ही २५ नागरिक आत्मदहन करू. कृपया याची पुणे म्हाडा मंडळाने गांभर्याने नोंद घ्यावी अशी माहिती युवा सेनेच्या विस्तारक शर्मिला येवले यांनी या वेळी दिली आहे.
तसेच त्यांनी याबाबत प्रत माहितिस्तव, मा.मुख्यमंत्री महोदय, मा.उपमुख्यमंत्री महोदय, मा.गृहनिर्माण मंत्री महोदय, मा.पालकमंत्री महोदय पुणे जिल्हा, मा.विरोधी पक्षनेते महोदय, मा.महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे मंडळ यांनाही निवेदन दिले आहे.......Read more

Comments
Post a Comment