नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्याने वेड्याबाभळीने वेढलेल्या व पायवाट असलेल्या परिसराचा कायापालट आ.संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते
नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्याने वेड्याबाभळीने वेढलेल्या व पायवाट असलेल्या परिसराचा कायापालट आ.संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा.
बोल्हेगाव मधील साळवे नगर, नवनाथ नगर अंतर्गत रोड चे कॉक्रेटीकरण तसेच गटार लाईन काम पूर्ण करण्यात आले. या कामाचा आज लोकार्पण सोहळा होता. हा सोहळा आमदार संग्राम जगताप यांचा हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व गावकऱ्यांनी फटाक्यांचा अतिशय बाजित नगरसेवक कुमारसिंह वाकळे आणि आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत केले आहे. तसेच सर्व गावकऱ्यांनी "कुमार भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है " आणि "राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो" या घोषणा देत गावकऱ्यांनी आनंद यावेळी व्यक्त केला. नगरसेवक वाकळे यांनी प्रभागातील बारकाईने अभ्यास करून विकास कामे मार्गी लावले. महापालिकेत त्यांना स्थायी सभापती पदाची संधी मिळाल्याने त्यांनी या भागातील चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले आहे.
विकासाचे व्हिजन असलेल्या नगरसेवकांकडून प्रभागातील कामे मार्गी लावण्यात येतात. याच कामाचे मूल्यमापन करून नागरिक निवडणुकीचा वेळी त्यांचा मागे उभे राहतात असे त्यांनी स्पष्ट केले आहे. विकासाला बळकटी देण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठीशी सदैव उभे राहण्याचे त्यांना आवाहन केले आहे. विकास कामाला गतिदेणारा नगरसेवक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केल्याचे असे आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे कौतुक केले. लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी खालील व्हिडिओ वर क्लिक करा.👇👇👇
यावेळी सर्व सावेडी आणि बोल्हेगावचे ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी, नगरसेवक राजेश कातोरे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन शिरसागर, विद्यार्थि स्वयंचे वैभव ढाकणे, दत्तू आप्पा वाकळे, मचींद्र वाकळे, भानुदास धिवर, अरुण ससे, राजू आप्पा वाकळे, भरत वाकळे,दादा रोहकले, माजी सरपंच ज्ञानदेव कापरे, बच्चू काटे, भाऊसाहेब गव्हाणे, भीमा साळवे, एकनाथ साळवे, नवनाथ भोर, साहेबराव पवार, नवनाथ ढोकणे, लक्ष्मण जगधाने, बबन जगधाने, आकाश डाके, रघुनाथ साळवे, भगचंद्र दुकले, एकनाथ साळवे , वैजूनाथ ढोकणे आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या....Read more

Comments
Post a Comment