ठाणे महापालिकेचे कार्यालयीन अधीक्षक घुगे भालचंद्र यांनी ५५ व्यावर्षी LLB पदवी प्राप्त केली.
ठाणे:- प्रतिनिधी
सध्याचे ठाणे महापालिकेचे कार्यालयीन अधीक्षक घुगे भालचंद्र यांनी ५५ व्यावर्षी LLB पदवी प्राप्त केली आहे. त्यांचा वडिलांचे नाव एकनाथ घुगे व आईचे नाव सुशीला घुगे आहे. घुगे भालचंद्र यांची आई नाशिक जिल्हा सिन्नर तालुका मधील वडगाव पिंगळे येथील आहे. तर वडील हे मनमाड येथील आहेत. त्यांचे वडील नोकरी निमित्त भुसावळ येथे रेल्वे मध्ये असल्यामुळे तेथे स्थायिक झाले आहेत. तसेच त्यांचा जन्म हा भुसावळ येथे झाला आहे.
घुगे भालचंद्र यांचा शिक्षण आणि नोकरीचा जीवन प्रवास कसा सुरू झाला?
त्यांचे १० वी पर्यंत चे शिक्षण हे सेंट अलोयसियस हायस्कुल जळगाव जिल्हा मधील नामांकित शाळेमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी काळाचौकी मुंबई येथे मामांकडे राहून परेल येथील आर. एम. भट महाविद्यालयात १२ वी पर्यंत शिक्षण घेतले, नंतर त्यांनी जळगाव येथील एम. जे. महाविद्यालय मधून B. Com. पदवी प्राप्त झाल्यानंतर MPSC- PSI परीक्षा दिली, परंतु शरीराने काटकुळ असल्यामुळे त्यांची निवड झाली नाही, त्यांचा नोकरीचा जीवन प्रवास हा ठाणे महानगरपालिका येथे १९८९ मध्ये लिपिक पदापासून सुरू झाला आहे.
त्यानंतर ते शांत न बसता त्यांनी नोकरी करत पुढील शिक्षण चालूच ठेवले. त्यावेळेस त्यांनी एमबीए(MBA) ही पदवी घेण्याचे ठरवले. त्यांनी त्यावेळी एमबीए(MBA) ही पदवी मानव संसाधन (Human Resource) शेत्रातून घेतली. त्यांनी एमबीए (MBA) ही पदवी यशवंतराव चव्हाण विद्यापीठ येथून घेतली आहे. त्यानंतर त्यांनी तेवढ्यावरच हार न मानता मराठी शाखेतून एम.ए. (MA)केले. एम. ए. त्यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठ येथून केले आहे. त्यानंतर आता त्यांनी एलएलबी पदवी देखील प्राप्त केली आहे. ही पदवी मुंबई विद्यापीठ येथून केली आहे.
या पदवी वितरण कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, आज ३४ वर्षात अनेक महत्वाच्या विभागात त्यांनी कामकाज केले आहे. त्यांनी महापालिकेत काम करत असताना मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ठाणे महापालिका येथे सभागृह नेते असतांना त्यांचे महापालिका तर्फे पी. ए. म्हणून कामकाज पाहिले आहे. तसेच मा. खासदार श्री राजन विचारे साहेब महापालिका मध्ये सभागृह नेते असतांना त्यांचे पी. ए. म्हणून कामकाज पाहिले आहे. ठाणे महानगरपालिका येथे मुख्य रोखपाल म्हणून ही त्यांनी कामकाज सांभाळले आहे. राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ही त्यांनी व्यवस्थापक म्हणून कामकाज पाहिले. तसेच त्यांनी महापालिका येथे अनेक विभागात काम देखील केले आहे.
सध्या भालचंद्र एकनाथ घुगे, कार्यालयीन अधीक्षक, दिवा प्रभाग समिती, ठाणे महानगरपालिका, या पदावर कार्यरत आहेत. त्यांना शिक्षणाची आवड आहे त्यामुळे त्यांनी वयाचा ५५ वर्षी कार्यालयीन अधीक्षक पदभार सांभाळत त्यांनी आज एल. एल. बी. (LLB) पदवी प्राप्त केली आहे.....Read more


Comments
Post a Comment