कलेक्टर ऑफिसातील सर्व AC बंद होणार, बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचा अनोखा निर्णय.
बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे कलेक्टर ऑफिसमधील कोणत्याच डिपार्टमेंटमध्ये एसी लावला जाणार नाही, असा अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. हा आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर अधिकाऱ्यांसह जिल्ह्यात ही चर्चेला उधाण आले आहे.
दीपा मुधोळ जिल्हाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्याचा चार्ज घेतल्यानंतर हा पहिला निर्णय त्यांनी स्वतःच्या केबिनपासून सुरु केला गेला आहे. हा निर्णय म्हणजे केबिनमध्ये कसल्या ही पद्धतीने एसी ची हवा नको आहे. तरी त्यांच्या केबिन मधील दरवाजे खिडक्या नेहमी उघड्या असायला पाहिजेत. त्यानंतर या पुढील काळात व्हीआयपी गाडीला ही एसी नसावा असे त्या बोलल्या आहेत. त्या एसी गाडीच्या काचा ही उघड्याच असाव्यात.
त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असलेला एसी बंद करण्यात यावा असे ही त्यांनी सांगितले आहे. तरी यामुळे रांगेत उभा असणाऱ्या सर्व सामान्य जनतेचा वेदना समजल्या पाहिजेत असे दीपा मुधोळ यांनी सांगितले आहे. सर्व अधिकाऱ्यानचा केबिन मध्ये फक्त फॅन आणि खिडकीतून येणारी नैसर्गिक हवा असावी, असा त्यांचा आदेश असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात ही खुद्द जिल्हाधिकाऱ्यां सह कार्यालयातील कुठल्याच विभागात वातानुकूलन यंत्रणा सुरु ठेवली नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांन मध्ये या गोष्टीचा गोंधळ उडाला आहे. तरी त्यांनी अशी पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावी अशी इच्छा वक्त केली आहे....Read more

Comments
Post a Comment