राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निर्णय होणार ५ मे ला.
याबाबत काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निर्णय येत्या ५ मे होणार आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदा संबंधी समितीचा जो निर्णय होईल तो मला मान्य अशी शरद पवारांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देताना, मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे शरद पवार बोलले आहेत. अध्यक्ष पदासाठी जी आपण समिती नेमली गेली आहे, त्यांनी ५ मे रोजी बैठक घ्यावी असे त्यांनी सांगितले आहे. तसेच जो समिती निर्णय घेईल, तो आपल्या सर्वांना मान्य असेल असे ही ते यावेळी बोलले आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांची ही पहिलीच प्रतिक्रिया आली आहे.
सदर समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पीसी चाको, नरहरी झिरवाळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गाडे यांचा समावेश असेल. तरी सर्व समिती निर्णय सर्वांना मान्य असेल असा निर्णय घेईल असेही त्यांनी सांगितले आहे.....Read more

Comments
Post a Comment