काँग्रेसचे आयटी पार्क साठी अहमदनगर मध्ये उपोषण.
स्टॉप मायग्रेशन, वूई वॉन्ट आयटी पार्क, स्टॉप ब्रेन ड्रेन, अशा प्रकारची हातात फलके घेऊन शहर काँग्रेसच्या वतीने एमआयडीसी कार्यालयासमोर आयटी पार्क सुरू करावे या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय उपोषण करण्यात येत आहे. यावेळी काळे म्हणाले की येथे उभारण्यात आलेला आयटी पार्क हा फक्त देखावा असून याचा आपण दीड वर्षापूर्वीच भांडा फोड केला होता. त्यावेळेस माझ्यासह कार्यकर्त्यांवर विनय भंगासारखे खोटे गुन्हे दाखल केले होते. मला वैयक्तिक राजकारणातून संपवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. परंतु विकास साठी रोजगारासाठी उद्योग वाढीसाठी असे कितीही गुन्हे झाले तरी काँग्रेस मागे हटणार नाही असं काळे म्हणाले.
उपोषणामधे त्यांनी कोणत्या मागण्या केल्या आहेत?
आज आपल्या शहरांमध्ये रोजगार हा ज्वलंत प्रश्न असून रोजगार मिळवण्यासाठी कितीतरी तरुण मुंबई पुण्याची वाट धरत आहेत. परंतु यामध्ये बदल झाला पाहिजे शहरांमध्ये नवीन रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत आपल्या शहरातील स्थलांतर न होता आपल्याच तरुणांना येथेच रोजगार मिळाला पाहिजे जेणेकरून आपला तरुण ही सक्षम होईल आणि त्याचबरोबर आपल्या शहरी सक्षम होईल. पूर्वी अशाच पद्धतीने सिलिकॉन व्हॅलीमध्ये आयटी इंजिनियर स्थलांतर करायचे. मात्र आता मुंबई पुणे हैदराबाद बंगलोर सारख्या शहरांमध्ये मोठ्या आयटीच्या संधी निर्माण निर्माण झाल्याने ते प्रमाण कमी झाले आहे. मात्र नगर शहरांमधून सुरू झालेल स्थलांतर चालूच आहे. हे स्थलांतर थांबवण्यासाठी नगरमध्येच आयटी पार्क झाला पाहिजे. आणि त्या नावाखाली झालेली फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही. तरुणांच्या हाती रोजगार तर उपलब्ध नाहीये परंतु धर्माच्या नावाने तरुणांचे माती भडकवण्याचे प्रकार मात्र चालू आहेत. हे प्रकार थांबलेच पाहिजे व तरुणांच्या हाती रोजगार निर्माण झालाच पाहिजे. या बरोबर उद्योजकांना देखील त्यांचे उद्योग वाढवण्यासाठी असे योग्य वातावरण निर्माण केले पाहिजे शहरात मोठ्या मोठ्या उद्योजकांनी आपल्या कंपन्या उभा राहिला पाहिजेत. यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याचं काळे म्हणाले.
काळे म्हणाले तरुणांच्या रोजगारासाठी छत्रपती संभाजी महाराज आयटी पार्क, उद्योग विकासासाठी छत्रपती शिवाजी महाराज एमआयडीसी सक्षमीकरण प्रकल्प, ससून हॉस्पिटलच्या धरतीवर महानगरपालिकेच्या वतीने सर्व सुविधा नियुक्त असे मध्यवर्ती ठिकाणी भव्य असे बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, महात्मा फुले सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणे, महिलांसाठी अहिल्याबाई होळकर स्वयंरोजगार प्रकल्प, मौलाना आझाद अल्पसंख्यांक रोजगार प्रशिक्षण केंद्र, बाजारपेठेसाठी प्रभू श्रीरामचंद्र व्यापारवृद्धी अभियान असे शहराच्या विकासाला चालना देणारे प्रकल्प मनपा व सरकारच्या वतीने सुरू करण्यासाठी उपोषण करण्यात आले होते.
यावेळी उपोषणात ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरिवाला, युवक उपाध्यक्ष आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, समीर शेख, प्रणव मकासरे, आदीं मान्यवरसह तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते......Read more

Comments
Post a Comment