भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मीरच्या चिनाब नदीत कोसळले; युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.
जम्मू-काश्मीर मध्ये किश्तवाडा येथे आपल्या भारतीय लष्कराचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सदर हेलिकॉप्टर मध्ये लष्कराचे तीन अधिकारी होते. चिनाब नदीत हेलिकॉप्टर कोसळले असून, तेथे बचाव कार्य लष्कराने सुरू करण्यात आले आहे.
सदर घटना जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात जीवित हानी झाली नाही. परंतु, चिनाब नदीत हेलिकॉप्टर कोसळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्या परिसरातील खराब वातावरना मुळे हा अपघात झाल्याचे लष्कराकडून सांगितले गेले आहे.
ज्या किश्तावाडा परिसरात ह्या हेलिकॉप्टरची दुर्घटना झालीय, तो परिसर अत्यंत दुर्गम परिसर असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. सदर दुर्गम भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. या हेलिकॉप्टरमधून भारतीय लष्कराचे तीन अधिकारी जात होते. हे हेलिकॉप्टर पाऊस आणि खराब हवामानामुळे क्रॅश झाले आहे. या सर्व अधिकाऱ्यांचे काय झाले? याची काहीच माहिती सुरुवातीला मिळत नव्हती. या घटनास्थळी रेस्क्यू टीम पाठवली गेली आहे. तरी तेथील स्थानिक नागरिकांनी बचावकार्य केले आहे असे सांगण्यात आले आहे.
सदर दुर्घटनेची माहिती भारतीय लष्करानेही दिली गेली आहे. हे हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळल्याचे लष्कराने म्हटलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे दोन पायलट आणि एक कमांडिंग अधिकारी होते. या दुर्घटनेतील कमांडिंग अधिकारी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. तसे एका पायलटला थोड्या प्रमाणात इजा झाल्याचे सांगितले आहे. त्यांना उपचारासाठी तेथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. परंतु, दुसऱ्या पायलट चा आणखी शोध चालू आहे. हेलिकॉप्टर नदीत कोसळल्याने ते पाण्याचा प्रव्हाने वाहत पुढे गेल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले आहे.
हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त कशी झाली याची आणखी ठोस माहिती मिळालेली नाही, याबाबत आणखी तपास सुरू आहे. सर्व कडून सांगण्यात आले आहे की, खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा असे बोलले जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. तरी हवामान खराब असल्यानेच हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र भारतीय लष्कराकडून या बाबतची आणखी कोणतीही माहिती दिली गेली नाही.
काय आहेत या लष्करी हेलिकॉप्टरची वैशिष्टे?
हे सैनिकी ALH हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टपरमध्ये एकावेळी 12 सैनिकी जवान बसू शकतात. या हेलिकॉप्टरची लांबी ही 52.1 फूट तर उंची सुमारे 16.4 फूट एवढी आहे. ध्रुव हेलिकॉप्टरचा अधिकतम वेग ताशी 291 की.मी.एवढा आहे. हे हेलिकॉप्टर एकावेळी 630 किलोमीटरपर्यंत उड्डान करू शकते. सैनिकी ALH हेलिकॉप्टर मध्ये प्रगत रडार तसेच इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेन्सर्स, शक्ती इंजिन, पूर्ण काचेचे कॉकपिट, उच्च-तीव्रतेचा शोध लाईट, प्रगत संप्रेषण प्रणाली, स्वयंचलित ओळख प्रणाली तसेच शोध आणि बचाव होमर यांचा समावेश केलेला आहे. साधारण 20 हजार फुटापर्यंत उंचीवर हे हेलिकॉप्टर जाऊ शकते....Read more

Comments
Post a Comment