अजित पवारांच्या मनात चालय तरी काय? येत्या चार दिवसांत कळेल; संजय शिरसाट यांचा सूचक इशारा.
आज महविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे, या सभेला सर्वच राजकीय आरोप प्रत्यारोप करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याचा चर्चा सुरु आहेत. तर अजित पवार भाजपसोबत त्यांचा काही आमदारांसह जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याचवेळी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुंबईत आज होणाऱ्या वज्रमुठ सभेवर निशाणा साधत अजित पवारांबद्दल मोठं सूचक वक्तव्य केले गेले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे या सभांमध्ये मनापासून उपस्थित राहत नसून, त्यांचे मन कुठे आहे, हे येणाऱ्या चार दिवसांत सर्वांना कळेल असं आमदार शिरसाट यावेळी म्हणाले आहेत.
आमदार संजय शिरसाठ यांचा या सूचक वक्तव्यामुळे अजित पवार खरचं भाजपसोबत जाणार आहेत का? या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
आमदार संजय शिरसाट काय म्हणाले?
आज महाविकास आघाडीची होणारी वज्रमूठ सभेवर प्रतिक्रिया देताना, आमदार संजय शिरसाट म्हणाले, या होणाऱ्या सभेत अजित पवार यांना सर्वात जास्त त्रास झाला असेल. अजित पवार यांना सभेसाठी बोलावले आहे. परंतु त्यांना सभेत खुर्ची आहे की नाही माहित नाही. परंतु अजित पवार सभेत आले तर काय बोलणार माहीत नाही. तसेच वज्रमूठ सभेत अजित पवार हे फक्त शरीराने असतील, मात्र मनापासून सभेत नसणार आहेत. ते मनातून कुठे असतील याबाबत 4 दिवसांत कळेल आणि सगळ्यांना दिसेल देखील असा सूचक इशारा आमदार संजय शिरसाठ यांनी दिला आहे. सध्या अजित पवार हे सगळे विषय हसून खेळून टाळत आहेत. याचाच अर्थ असा होतो की, त्यांच्या मनात काहीतरी विचार चालू आहेत आणि ते याबाबत निर्णय घेतील असा सूचक इशारा देत संजय शिरसाठ यांनी वज्रमूठ सभेवर टीका केली आहे.
आज मुंबईत होणाऱ्या वज्रमूठ सभेवरून आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीसह ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यावेळी ते बोललेली की, यापूर्वी सुद्धा त्या मैदानावर अनेक सभा झाल्या. परंतु त्या सभा बाळासाहेब ठाकरे यांच्या झाल्या आहेत. परंतु त्या सभांसोबत आज चा होणाऱ्या सभेची बरोबरी करता येणार नाही. परंतु सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे ते कळत नाही. राष्ट्रवादी, काँग्रेस का ठाकरे गटाचा मागे आहे हे कळणे सध्या शक्य नाही.
येत्या १७ सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठक होणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्याची मागणी सातत्याने होत आहे, त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मंत्रिमंडळाची बैठक ही छत्रपती संभाजीनगरात व्हायला हवी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यातूनच मराठवाड्यावरील अन्याय दूर करता येईल. त्यामुळे ही बैठक मराठवाड्यात झाली पाहिजे त्या साठी मी प्रयत्न करत आहे. असे आमदार संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले.... Read more

Comments
Post a Comment