धक्कादायक माहिती महाराष्ट्र दिनीच तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांने गळफास घेत संपवले आयुष्य.
रायगड:-
कामगार दिनी तसेच महाराष्ट्र दिनी एका कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सदर घटना ही रायगड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या पुढील माहितीनुसार, सदर घटनाही पोलादपूर येथील सरकारी तहसील कार्यालयात घडली आहे. गळफास घेऊन तहसील कार्यालयात आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव राजेंद्र केकान असे होते. सदर कर्मचाऱ्यांचे वय हे 30 वर्षे होते. कर्मचारी राजेंद्र केकान हे मूळचे बीड जिल्ह्यातील खोकर मोहा येथील होते. हे सध्या नोकरी निमित्त रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे राहत होते.
सदर व्यक्तीने पोलादपूर तहसील कार्यालयाच्या मुख्य लोखंडी दरवाजाला गळफास लावत आत्महत्या केली आहे.
तहसील कार्यालयातच आत्महत्या का केली? महाराष्ट्र दिनीच आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलादपूर परिसरातील पोलिसांनी सदर घटनास्थळी दाखल होत, राजेंद्र कोकण यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. सदर व्यक्तीचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टम साठी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. कामगार दिनी तसेच महाराष्ट्र दिनी कर्मचाऱ्यांने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
आत्महत्या मागचे कारण काय असू शकते? तहसील कार्यालयातील कामगारांचे काही प्रश्न होते का?
असे अनेक प्रश्न तेथील नागरिकांच्या मनात उद्भवत आहेत. तरी सदर आत्महत्याचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.......Read more


Comments
Post a Comment