राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पद ठरलं?
राज्यात दादा, केंद्रात ताई सुप्रिया सुळे यांचं नाव अध्यक्षपदासाठी जवळजवळ फायनल..
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खाजदार सुप्रिया सुळे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केंद्रात ताई आणि राज्यात दादा या धोरणानुसार सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा. शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांच्या उत्तराधिकारी कोण होणार? असा प्रश्न केला जात आहे. या स्पर्धेत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील या तीन नेत्यांची नावे समोर आहेत. मात्र, या सर्वांमध्ये सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. खाजदार सुप्रिया सुळे याच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाच्या नव्या अध्यक्ष होणार असल्याचं सांगितले जात आहे. असे संकेत मिळत आहेत.
त्यामुळे खाजदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या पहिल्या महिला अध्यक्ष असणार आहेत. तसेच राज्यातील एखाद्या राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला अध्यक्षा ही ठरणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात चांगलीच उच्चुक्ता निर्माण झाली आहे.....Read more

Comments
Post a Comment