शरद पवार सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद ! आत्मचरित्राच्या प्रकाशनावर मोठी घोषणा !
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी १५ दिवसांत दोन राजकीय धमाके होणार आहेत, असे सांगून जवळपास दोन आठवडे उलटून गेले आहेत. शरद पवारांच्या आजच्या घोषणेने सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण आता शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचा पुढचा बॉस कोण होणार हा प्रश्न आहे.
शरद पवार म्हणाले, अनेक वर्षांपासून राजकारणात पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या वयात मला हे पद भूषवायचे नाही. दुसरे कोणीतरी पुढे यावे असे वाटते. आता पक्षाचा अध्यक्ष कोण होणार हे पक्षश्रेष्ठींनाच ठरवावे लागेल.
कार्यक्रमात गोंधळ:
शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा करताच कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पद न सोडण्याचे आवाहन केले. कार्यकर्ते शरद पवारांना निर्णय बदलण्याचे आवाहन करताना दिसत होते. यावेळी काही समर्थक आणि कार्यकर्तेही रडताना दिसले.
शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित काय म्हणाले ?
शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवार म्हणाले, आम्ही कुटुंबीय आणि पक्षाचे नेते एकत्र बसू. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. पक्षाच्या बैठकीत शरद पवार तुमच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतील, याची खात्री मी देऊ शकतो.
५६ वर्षे मी राजकारणात !
१९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.
निर्णय मागे घ्या नाही तर सभागृह सोडणार नाही…
"लोक माझा सांगाती” पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस सभागृहात पवारांनी घोषणा केली आहे . हा निर्णय मागे घ्या नाही, तर सभागृह सोडणार नाही, अशी विनंती कार्यकर्ते करत आहेत. त्यांनी समिती स्थापन केली आहे. या समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पीसी चाको, नरहरी झिरवाळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गाडे यांचा समावेश असेल.....Read more

Comments
Post a Comment