राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा:-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी खारघर येथे झालेली, घटना हे सरकारी हत्याकांड असून, अजूनही याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला नाही. तरी सदर घटनेला आपल्या सरकारचे ढिसाळ नियोजनच जबाबदार दिसत आहेत. या खारघर घटनेची हायकोर्टाच्या न्यायाधिश यांचामार्फत चौकशी केली गेली पाहिजे. तसेच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांना तातडीने मदत दिली गेली पाहिजे. तसेच बारसु येथील रिफायनरी प्रकल्पसाठी स्थानिकांचा जबरदस्त विरोध असताना, सध्याचे सरकार हे जबरदस्तीने रेटत आहे. या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे, यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, अशा सर्व मागण्या राज्यपाल यांच्याकडे केल्या आहेत.
आस्मानी सुलतानी संकटाने शेतकरी पुरता पिचलेला असून राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. आपले महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांना मदत करत नाही, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु अजून ही पंचनामे करण्यात आले नाहीत. त्याच प्रमाणे सरकारच्या महसूल व कृषी विभागाकडे पीक पेऱ्याची सर्व माहिती उपलब्ध असते, त्याच्या आधारे सरकारने भरीव अशी शेतकऱ्यांना मदत द्यावी असे ही सांगण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात सिबील स्कोअर ची जाचक अटक असल्याने भरपूर प्रमाणात शेतकरी कर्जापासून वंचित रहात आहेत. शेतकऱ्याला कर्ज मिळू नये, यासाठी केंद्र सरकार श्री. नरेंद्र मोदी यांनी सिबील स्कोअर ची अट महत्वाची केली आहे. तरी ती अट शिथील करण्यात आली पाहिजे.
त्या अधिवेशनात सर्व सामान्य जनतेवर होणारा अन्याय यावर बोलता येईल. आणि होणारा अन्याय थांबवता येईल अशी आशा करतो....Read more

Comments
Post a Comment