आता अहमदनगरमध्ये होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक:- अहमदनगर महापालिका प्रशासन
अनेक वर्षापासून प्रोफेसर कॉलनी चौक येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचे रखडले होते. तरी आज छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज अहमदनगर महापालिकेतर्फे स्थायी समितीच्या सभेत निविदा प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे येत्या १४ मे रोजी होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम खर्चाला ही मान्यता दिली गेली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा १२ फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. यावेळी स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे बोलले, की प्रोफेसर चौक येथे १८ फुटी चबुतरा बांधण्यात येणार आहे आणि त्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा १२ फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी स्मारक सुशोभी करणाचे काम ही काम ही केले जाणार आहे. यापूर्वी माजी नगराध्यक्ष कै. सुरेश शेळके यांनी नेप्ती नाका येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे ठरविले होते. त्यानुसार कामालाही सुरूवात करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय अडचणीमुळे प्रलंबित राहिलेले पुतळ्याचे काम आता प्रोफेसर कॉलनी चौक येथे होणार आहे, त्यामुळे सर्व नगरकरांन चा मनाला याचा आनंद होत आहे. तरी या विषयाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती कवडे यांनी यावेळी दिली आहे.
यावेळी अहमदनगर महापालिका विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक मुदस्सर शेख, ज्योती गाडे, गौरी ननवरे, प्रदीप परदेशी, सुवर्णा गेनाप्पा, पल्लवी जाधव, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे तसेच यावेळी आदी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते....Read more
Comments
Post a Comment