Skip to main content

काँग्रेसचे पक्षनेते राहुल गांधी यांना जेलमध्ये जावं लागणार? गुजरात हायकोर्टाचा नेमका निकाल काय?

काँग्रेसचे पक्षनेते राहुल गांधी यांना जेलमध्ये जावं लागणार? गुजरात हायकोर्टाचा नेमका निकाल काय?

        काँग्रेसचे पक्षनेते राहुल गांधी यांनी न्यायालयात केलेल्या अपील मध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. सदर याचिका ही सत्र न्यायालयात फेटाळली गेली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील देखील केले होते. यावर अपीलवर आज सुनावणी पूर्ण झाली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अपिलावर गुजरात उच्च न्यायालयात आज सुनावणी पूर्ण झाली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. विशेष म्हणजे गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला आहे. सदर गुजरात न्यायालयाचा निर्णय हा आता न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुरत येथील न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती द्यावी ही याचिका सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केले गेले होते. त्यावर आज सुनावणीला पूर्ण झाली आहे.


          राहुल गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला आहे. 23 मार्चला सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधी यांना ‘मोदी’ नावावर केलेल्या टिपण्णीवर 2 वर्षाची सजा सुनावली होती. त्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्यपद देखील गेले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षनेते राहुल गांधी यांनी सुरत सत्र न्यायालयात या संदर्भात अपील देखील केले होते.

     सदर न्यायालयात केलेल्या अपीलमध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. ही याचिका सत्र न्यायालयात फेटाळली गेली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केले आहे. यावर न्यायाधीश गीता गोपी यांनी राहुल गांधी यांच्या केसमधून माघार घेतली गेली होती. त्यानंतर न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक यांच्यासमोर सुनावणीला पूर्ण झाली आहे. त्यांनी याबाबत आज निर्णय राखून ठेवला आहे.

या प्रकरणात याचिकाकर्ते पुर्णेश मोदी यांना न्यायालयाने नोटीस बजावली होती. या प्रकरणावर पुर्णेश मोदी यांनी न्यायालयाला आपलं म्हणणं सादर करत ही हार जीतची लढाई नाही. ही समाजिक लढाई असल्याचं म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

        राहुल गांधी यांनी कर्नाटक येथील एका रॅलीत 13 एप्रिल 2019 ला ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी यांची नाव कॉमन का आहेत? सगळ्या चोराचे नाव मोदी का आहेत? असं विधान केले होते. यावर भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर राहुल गांधी यांना न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

        दरम्यान, राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देशात काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्यावरील या कारवाईमुळे त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल का? याबाबत साशंकता असल्याची चर्चा सुरू आहेत. या सगळ्या घडामोडींनंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात शिक्षा स्थगित करण्यासाठी अपील केले गेले आहे. तरी पुढील निर्णय आणखी बाकी आहे.....Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...