कार्यकर्त्याचा मान राखत विरोधी पक्षनेते अजित पवार थेट झेरॉक्स दुकानात.
बारामती:-
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे एका झेरॉक्स दुकानाच्या चालकाने एक इच्छा व्यक्त केली आणि अजित पवारांनी तात्काळ त्याची ती इच्छा पूर्ण ही केली.
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. अजित पवार हे नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट बोलत असतात, त्यामुळे राजकारणामध्ये त्यांचे चाहते भरपूर आहेत. अजित पवार हे कायम आक्रमक स्वभावाचे आहेत असे बोलले जाते, परंतु अजित पवारांचे आज एक वेगळे आणि खूपच खास रूप पहायला मिळाले. त्यांचा स्थानिक बारामती दौऱ्यावर असताना अजित पवार यांच्याकडे एका झेरॉक्स दुकानाच्या चालकाने एक इच्छा व्यक्त केली आणि अजित पवारांनी तात्काळ त्याची ती इच्छाही पूर्ण ही केली.
यावेळी घडले असं काही की, आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या दौऱ्या दरम्यान बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी केली. त्यानंतर बारामतीत नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाची पाहणी यावेळी त्यांनी दौऱ्यावर असताना केली. पाहणी झाल्या नंतर त्यांनी राष्ट्रवादी कार्यालय येथे ध्वज वंदन केले. ध्वज वंदन झाल्या वर त्यांना कार्यकर्ते भेटण्यासाठी आले. यावेळी एक कार्यकर्ता आला आणि दादाला बोलला दादा मी झेरॉक्सचे दुकान चालू केले आहे. माझी इच्छा आहे की माझा झेरॉक्स दुकानाला तुम्ही भेट द्यावी. त्या झेरॉक्स दुकानदाराचे नाव सुहास मढवी असे आहे. त्यांनी यावेळी कुठला ही विचार न करता कार्यकर्त्याला चला बोलले, आजच भेट देऊ, या तुमचा दुकानला. यावेळी हा छोटा कार्यकर्ता अजित दादा आले म्हणून भाऊक झाला आणि दादाचे त्यांनी आभार मानले.
त्यातून आज दादांचा आपल्या कार्यकर्त्यावर असलेला जिव्हाळा दिसून आला. त्यामुळे सर्वांना दादाचे कौतुक वाटले. या अगोदर सर्वांना दादाचा रागीट स्वभावच दिसत होता, पण या घडलेल्या गोष्टीतून दादाचा आपल्या कार्यकर्त्यावर असलेले प्रेम ही दिसून आले......Read more

Comments
Post a Comment