नाना पटोलेंचे मोठे वक्तव्य शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार?
राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार? असे पवारांच्या राजीनाम्यानंतर दुसऱ्याच दिवशी पटोलेंचं मोठं वक्तव्य केले आहे. नाना पटोलेंची प्रतिक्रिया राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. यावर आता नाना पटोलेंनी सूचक विधान देखील केले आहे.
मुंबई : २ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी शरद पवार यांच्या लोक माझे सांगती. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तक सोहळ्यातच शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. पवारांचा हा निर्णय जसा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का मानला जात आहे. तसाच तो मविआच्या इतर घटक पक्षांसाठी देखील धक्कादायक आहे. पवारांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे अध्यक्ष नाना पोटले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले आहेत नाना पटोले:
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीबाबत मोठं वक्तव्य केले. राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याची शक्यता असून, आमच्यासोबत किती दिवस राहातात ते माहिती नसल्याचं त्यांनी म्हटले होते. त्यातच आता शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे......Read more

Comments
Post a Comment