अहमदनगर मध्ये धक्कादायक घटना घडली..पत्नीची हत्या करून पतीने घेतला गळफास.
अहमदनगर:
अहमदनगर मध्ये धक्कादायक अशी घटना घडली आहे. पत्नीची हत्या करून पतीने राहत्या घरी गळफास घेतला आहे. तरी ही घटना आयकॉन पब्लिक स्कूल जवळ ,शिवनेरी चौक ,स्टेशन रोड येथील घरामध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने अगोदर घरामध्येच त्याचा पत्नीची आत्महत्या केली आहे. तरी आरोपी संदीप रामचंद्र गुजर हे आहेत. संदीप रामचंद्र गुजर यांचे वय 53 वर्ष सांगण्यात आले आहे. त्याचा पत्नी आशा संदीप गुजर ह्या आहेत. त्यांचे हे वय 50 वर्ष होते. त्यांचा कौटुंबिक वादातून दोघांनी आयुष्य संपवल्याचे समजले आहे.
सदर घटनेमध्ये पतीने अगोदर पत्नीचा खून केल्याचे सांगण्यात आले आहे. सदर आरोपी पतीने पत्नीला जीवे ठार मारून नंतर स्वतः घरात गळफास घेतल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी घराचे दरवाजे बंद केले होते. पोलिसांनी दरवाजे तोडून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यानंतर दोन्ही बॉडी सरकारी दवाखाना येथे नेण्यात आल्या आहेत. याबाबत अहमदनगर कोतवाली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी नोंदवण्यात आलेले गुन्हे:
या घटनेचा कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करत आहे असे सांगितले आहे. तसेच मयत आरोपीचा वेगळा ADR दाखल करण्यात आला आहे. तरी सदर घटना कश्यामुळे घडली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तरी सदर घटनेचा पुढील तपास पोलिस अधिकारी करत आहेत. या घटनेची नोंद कोतवाली पोलिस स्टेशन येथे करण्यात आली आहे.....Read more

Comments
Post a Comment