दुबईतील समुद्रात ही महाराष्ट्रातील युवकांनी महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी त्रिविक्रम ढोल पथकाचे वादन
दुबईतील समुद्रात ही महाराष्ट्रातील युवकांनी महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी त्रिविक्रम ढोल पथकाचे वादन.
दुबईतील समुद्रात ही महाराष्ट्रातील युवकांनी महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी त्रिविक्रम ढोल पथकाचे वादन करण्यात आले. महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी हा आगळावेगळा विश्वविक्रम करण्यात आला आहे. याचा सर्व महाराष्ट्रातील लोकांना अभिमान आहे. या गोष्टीचा मराठी माणसांना गर्व आहे.
सातासमुद्रापार असलेला मराठी माणूस देखील जिथे असेल, तिथे वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा करतो आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दुबईत स्थायिक असलेल्या महाराष्ट्रातील युवकांच्या त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने चक्क पर्शियन गल्फ या समुद्रात जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल 'बुर्ज अल अरब' याच्यासमोर पाण्यात ढोल ताशाचं वादन केले गेले आहे. पथकाचे संस्थापक सागर पाटील यांच्या डोक्यातून ही आगळी वेगळी संकल्पना समोर आली आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक केले जात आहे.
या उपक्रमात पथकातील 20 वादकांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी सहभाग होता. या पथकात महिलांनी ही चांगल्या प्रकारे सहभाग घेतला होता.....Read more


Comments
Post a Comment