माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी अहमदनगर येथे बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आगामी सर्व निवडणुकांमध्ये कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेच्या बळावर विरोधकांना भुईसपाट करणार असल्याचा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला आहे.
या शुक्रवार दि. ५ रोजी नगर तालुक्यातील शेंडी येथे भाजपच्या वतीने बुथ सशक्तिकरण अभियाना संदर्भात निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, अंतू वारुळे यांच्या सह पाथर्डी व नगर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित यावेळी होते. यावेळी पाथर्डी व नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व विजयी झालेल्या संचालकांचा सत्कार ही करण्यात आला आहे.
याप्रसंगी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीप्रमाणे एकजूट दाखविल्यास आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना भुईसपाट करण्यात येईल असे सांगितले. तरी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पराभव अटळ आहे. तसेच विरोधकांचे नाव घेण्या इतपत देखील त्यांची पात्रता राहिलेली नाही. बाजार समितीतील विजय हा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ आहे. विरोधकांना महत्त्व न देता तरी आपले पुढील कार्य सुरू ठेवायचे आहे. विरोधक हे ५ वर्ष गप्प बसतात आणि इलेक्शन लागले की जागे होतात. जनतेचे परिवर्तन करण्यासाठी खोटे आरोप करतात. परंतु जनतेला त्यांचा खेळी सर्व माहित झाल्या आहेत. त्यामुळे विरोधकांवर लक्ष न देता आपले काम चालू ठेवायचे जनता आपोआप न्याय देण्याचा प्रयत्न करते.
बुथ रचनेच्या नियोजनात पाथर्डी, नगर व राहुरी तालुका मागे असल्याने वरिष्ठ नेत्यांना माझ्याबद्दल तसेच खासदार सुजय विखे यांच्या बद्दल मनात शंका, गैरसमज निर्माण होत आहेत. कोणा एका मुळे पक्ष चालत नाही त्यासाठी सर्वांचे सहकार्य लागते. निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाने जो उपक्रम राबवून दिला आहे. त्याप्रमाणे नियोजन केल्यास सत्याचा विजय निश्चित होतो. बुथ सशक्तिकरण अभियान गांभीर्याने घेऊन प्रत्येक गावात राबविणे गरजेचे आहे. जिल्हा बँक स्थापनेपासून शेतकऱ्यांना लाभ झाला नाही, तो लाभ मिळवून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे वेळ मिळत नाही. बुथ सशक्तीकरण अभियानात सर्वांनी सक्रिय होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक गणात बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.
मी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वापरत नाही. त्यामध्ये गुरफटून न जाता मला लोकांना प्राधान्य देऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. राहुरी बाजार समितीत झालेल्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी मी राहुरी, पाथर्डी तालुक्यात वेळ देणार आहे. त्यामुळे आता नगर तालुक्यातील जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेण्याची गरज असल्याचे यावेळी शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी सांगितले की, बुथ सशक्तीकरण अभियाना अंतर्गत सरल व नमो ॲप डाऊनलोड करावी. त्यातील नियोजनानुसार गाव पातळीवर सर्वांनी काम करावे. जिल्हा बँकेच्या तसेच बाजार समितीच्या निवडणुकीनंतर विरोधकांचे तोंड बंद झाले आहे. कर्डिले हे सत्याला नेहमीच न्याय देत आले आहेत. महाराष्ट्र राज्य सुजलम, सुफलम घडविण्यासाठी भाजपची एक हाती सत्ता येणे गरजेचे आहे.
तर विधान परिषदेवर असतो.
नगर, पाथर्डी, राहुरी तालुका बुथ नियोजनात मागे राहिला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आपली दखल घेत नाहीत. आपले काम जोरात असते तर वरिष्ठांनी दखल घेऊन विधान परिषदेवर आमदार राम शिंदे यांच्या प्रमाणे माझी ही वर्णी विधानपरिषदेवर लागली असती, अशी मिश्किल टिपण्णी शिवाजी कर्डिले यांनी यावेळी केली आहे.
कर्डिले यांच्या आमदारकीसाठी ‘गुजरात पॅटर्न’
शिवाजीराव कर्डिले यांना आमदार करायचे असेल तर मतदार संघात ‘गुजरात पॅटर्न’ राबवावा लागेल. गुजरात मध्ये बूथ सशक्तिकरण झाल्याने सहाव्यांदा तेथे भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे कर्डिले यांना आमदार करायचे असेल तर गुजरात प्रमाणे आपल्याकडे बूथ सशक्तीकरण अभियान सक्रियपणे राबविण्याची गरज असल्याचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे......Read more

Comments
Post a Comment