नगर तालुक्यातील जेऊर येथे काल ग्रामदैवत बायजा माता यात्रा उत्सव दरम्यान दगडफेक झाल्यामुळे जेऊर यात्रा उत्सव ला गालबोट लागले आहे.
नगर तालुक्यातील जेऊर येथे काल ग्रामदैवत बायजा माता यात्रा उत्सव दरम्यान दगडफेक झाल्यामुळे जेऊर यात्रा उत्सव ला गालबोट लागले आहे. समजलेली माहिती अशी आहे की, रहाडगाडग्या मधे बसण्याच्या कारणावरून सायंकाळी दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. संध्याकाळी त्याचे पर्यावसन दंगलीमध्ये झाले होते.
(संग्रहित छायाचित्र)
यात्रेमध्ये आलेल्या भाविकांवर देखील दगडफेक झाली तसेच यात्रेमध्ये असलेल्या दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. जवळपास अर्धा तास १०० ते २०० जणांच्या जमावाकडून ही दगडफेक केली जात होती. त्यामुळे गावामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. या दगड फेकी मध्ये अनेक जन जखमी देखील झाले आहेत. यामधील काहींना नगरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कडून दोन्ही क्षेपकावरून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते, तरी देखील दगडफेक थांबली नव्हती. यात्रेमध्ये दगडांचा खच साचला गेला होता. पोलिसांनी देखील झालेल्या दंगलीनंतर सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले, असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील सांगण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसापासून जेऊर मध्ये जातीय तणाव वाढलेला दिसून येत आहे. हा तणाव यात्रेमध्ये बाहेर आला आहे. त्यामुळे येथे जमाव बंदी करण्यात आली आहे. सदर घडलेल्या घटनेमुळे बाईचा माता यात्रा उत्सवाला गालबोट लागले आहे.....Read more

Comments
Post a Comment