PM Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना अटक.
पाकिस्तान:-
पाकिस्तान देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज अटक करण्यात आले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या राजधानी इस्लामाबाद येथून अटक करण्यात आले आहे. पाकिस्तान मधील तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे अध्यक्ष तसेच माजी पीएम इमरान खान यांना इस्लामाबाद हाय कोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना का अटक केले गेले आहे?
पाकिस्तान मधील निमलष्करी दलाच्या जवानांनी पंतप्रधान इम्रान खानला घेरले आणि त्याला एका वाहनापर्यंत नेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी इम्रान खानच्या समर्थकांनी ही व्हिडीओ शेअर केला असून, त्याला “खराब धक्काबुक्की” करण्यात आल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना अलकादिर ट्रस्ट केसमध्ये अटक केले असल्याचे सांगण्यात आले आहे. पीटीआयचे नेते इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. पीटीआयने इम्रान खान यांच्या अटकेचा निषेध ही केला आहे, अशी माहीती आहे. त्यामुळे पाकिस्तानचे वातावरण चांगलेच तापले आहे.
या अगोदर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरूद्ध इस्लामाबाद सत्र न्यायालयाने एक अजामीनपात्र अटक वॉरंट जारी ही केले होते. सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीशाला धमकावल्या प्रकरणी खान यांच्याविरूद्ध ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना कधीही अटक केली जाण्याची शक्यता ही या अगोदर वर्तवण्यात आली होती, यामुळे ही कारवाई आज करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
खानच्या अटकेमुळे त्यांच्या पक्षाकडून पाकिस्तान मध्ये देशव्यापी निषेध.
माजी पंतप्रधान खानच्या अटकेमुळे त्यांच्या पक्षाकडून पाकिस्तान मध्ये देशव्यापी निषेधाचे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या अण्वस्त्रधारी पाकिस्तान देशाला आणखी एक धक्का बसला आहे. माजी पंतप्रधानांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सदर ठिकाणी मोठा जमाव तयार झाल्याने पोलिसांकडून जमाव रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफा आणि अश्रुधुराचा वापर केल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच इस्लामाबाद येथील पोलिसांनी राजधानी शहरात कलम 144 लागू करण्यात आला आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते मुसरत चीमा यांनी ट्विट करून दावा केला आहे की, ते इम्रान खान यांचा छळ करत आहेत. ते इम्रान खानला अटक करून मारहाण करत आहेत. यावेळी पीटीआयने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये इम्रान खानचे वकील यांनी इम्रान खान गंभीर जखमी झाल्याचा ही दावा करण्यात आला आहे.
अलकादिर ट्रस्ट प्रकरण काय आहे?
पाकिस्तान मधील अलकादिर ट्रस्ट प्रकरण हे एक तेथील विद्यापीठाशी संबंधित प्रकरण आहे. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान असताना त्यांनी या विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांची जमीन ही बेकायदेशीर रित्या दिली गेली होती. या प्रकरणाचा सर्व खुलासा पाकिस्तान मधील सर्वात श्रीमंत उद्योगपती मलिक रियाझ यांनी केला गेला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी इम्रान खान यांनी त्यांना धमकावून कोट्यवधी रुपयांची जमीन त्यांच्या नावावर करून घेतल्याचा आरोप श्रीमंत उद्योगपती मलिक रियाझ यांनी केला आहे. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित असलेला रियाझ आणि त्याच्या मुलीच्या संभाषणाचा एक ऑडिओ ही लीक झाला होता. यामध्ये रियाझच्या मुलीने सांगितले की, इम्रानची पत्नी बुशरा बीबी सतत त्याच्याकडे पाच कॅरेटची हिऱ्याची अंगठी मागत असल्याचे सांगण्यात आले आहे........Read more


Comments
Post a Comment