Raj Thackeray: जमिनी कोणाला विकू नका! रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरे यांचे कोकणवासीयांना आवाहन.
कोकण:
सर्व कोकणवासीयांना माझे आवाहन आहे की, जमीन घ्यायला कोणी आले, तर आपली जमीन विकू नका. व्यापारी लोकप्रतिनिधींनी सध्या जमिनींचा पार बाजार उठवला आहे. गरीब जनतेकडून कवडीमोल किमतीत जमीन घेतात आणि सरकारकडून त्या जमिनींचा मोठा मोबदला घेतात. त्यामुळे कोकणवासीयांना सावध राहण्याची गरज असल्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. रत्नागिरीत आयोजित केलेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरे कोकणवासीयांना म्हणाले, बारसू परिसरातील कातळ शिल्पांची नोंद युनेस्कोत आहे. त्यामुळे बारसू येथे प्रकल्प होऊ शकत नाही. या कातळ शिल्प असलेल्या ठिकाणापासून काही किमी पर्यंतची जागा ही वापरता येत नाही. येथील कातळ शिल्प बघायला जगभरातील लोकं येतात, असे ही ते म्हणाले आहेत. कोकणातील जनतेला नेहमी गृहित धरले जाते. मतदान झाल्यानंतर कोणी विचारत नाही. २००७ चा मुंबई-गोवा महामार्गाला आज १५ वर्षे पूर्ण झाली तरी अजून ही रखडला गेला आहे. परंतु समृद्धी महामार्गाचा प्रकल्प चार वर्षात पूर्ण केला आहे. याबाबत कोणी सरकारला प्रश्न विचारत का, तरी याला कारणीभूत फक्त तुम्ही सोडून दिलेले राजकारणी आहेत.
अशांना तुम्ही परत परत निवडून देणार असाल तर काय वेगळं होणार आहे? कारण निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना माहित आहे की काम नाही केलं तरी निवडून देणार आहेतच मग कशाला काम करायची?
याबाबत मागील काही दिवसापूर्वी मी मुंबई गोवा हवे वरून प्रवास करताना झालेल्या रस्त्याची दुर्दशा पाहून याबाबत फडणवीसंना तसेच नितीन गडकरींना फोन केला होता. त्यावेळी त्यांना रस्त्याची अवस्था सांगितली परंतु ते म्हणाले की कॉन्ट्रॅक्टर पळून गेले आहेत. मग सांगा एकही लोकप्रतिनिधी विचारतोय का कॉन्ट्रॅक्टर का पळून गेले आहेत? यामागे कॉन्ट्रॅक्टर पळून लावण्यात येतील तुमचे लोकप्रतिनिधी आहेत असे राज ठाकरे म्हटले.
आज कोकणातील तुमच्या जमिनी तुम्ही बाहेरील व्यापाऱ्यांना विकतात. ही व्यापारी तुमच्या डोळ्यासमोर व्यवहार करत आहेत तरी कोकणी माणूस जागा का होत नाही? हे व्यापारी मित्रांच्या मार्फत जमिनीचे व्यवहार करून हजार पट नफा कमवत आहेत. तरी हे सर्व व्यापारी सरकारचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे या व्यापारी लोकांना माहीत असते की प्रकल्प कुठे येणार आहे. त्यामुळे हे व्यापारी लोक गरीब जनतेच्या जमिनी घेऊन मोठ्या प्रमाणावर नफा कमवतात. आम्ही गरीब जनता ही गरीबच राहत चालली आहे त्यामुळे लवकर यांनी डोळे उघडण्याचे काम करावे अशी विनंती आहे. या सर्व गोष्टींना येथील लोकप्रतिनिधी कारणीभूत आहेत. तरी येथील जनतेने या लोकप्रतिनिधींना धडा शिकवणे गरजेचे आहे.
सर्व लोकप्रतिनिधींना प्रकल्प येणार असल्याचे आधी समजते. कवडीमोल किमतीत जमीन घ्यायची आणि सरकारकडून हजारपट मोबदला घेऊन ते मोकळे होतात. त्यांचा हा व्यापार सुरू आहे. आठपैकी सहा 'भारतरत्न' आपल्या कोकणातील आहेत. प्रतिभासंपन्न प्रदेश असताना तुम्हाला मूर्ख बनवले जात असल्याचेही राज म्हणाले.
सर्व कोकणवासी यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा सांगून ठेवले आहे की, आक्रमक समुद्र मार्गाने येथील इथल्या जमिनीवर कब्जा करतील छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी आरमार उभारले होते. परंतु या गोष्टीचा आदर्श न घेता कोकणवासी लोक कुठे भरकटत आहे दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीतून दिसून येते की त्यांना किती पुढचं दिसत होते. तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला जागे करून ठेवले आहे तरी पण आपण जागे राहिलो नाहीत. मागे झालेल्या १९९२ मध्ये बॉम्बस्फोटाचा आरडीएक्स हा समुद्रमार्गेच आला होता. तसेच २६/११ हल्ल्याचे अतिरेकी देखील समुद्रामार्गानेच आले होते. एवढं सगळं आपल्या डोळ्यासमोर घडला आहे तरी आपण या गोष्टीतून शिकायला तयार नाही आहोत आणखी. तरी माझ्या प्रिय कोकणवास यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुमच्या जमिनी ह्या कोणा व्यापाऱ्याला विकू नये.
सध्या राजकारणातील खेळी आहे की कुठले तरी मुद्दे काढायचे आणि महत्त्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष करायचे. आपल्या परिसरात प्रकल्प आणायचे आणि जमिनीच्या व्यवहारात बाहेर त्यांनी पैसे कमवायचे हे पिढ्यानपिढ्या चालूच आहे यांचे त्यामुळे आता सामान्य जनतेला जागे होण्याची गरज आहे. मागील काही वर्षी दाभोळांच्या एनरोनचा वेळेस, तसेच नाणार आणि आता बारसू या ठिकाणचे सर्व जमिनी या अमरावती लोकांनी घेतले आहेत. आणि त्याच जमिनी आता आमच्या सव्वा भावात सरकारला विकणार आहेत. त्यामुळे ते व्यापारी श्रीमंत झाले आणि माझा कोकणी माणूस हा गरीबच राहिला. या सर्व गोष्टीचे मला खूप वाईट वाटते परंतु तुमच्यावर रागही येतो.
या सर्व गोष्टीत शिवसेनेची भूमिका नक्की काय आहे रिफायनरी बाबत हे कळनास झाले आहे?
तरी याबाबत शिवसेनेने रिफायनरी साठी भूमिका नक्की काय घेतली आहे हे जनतेला तरी सांगावे?
शिवसेनेचे खासदार वेगळे बोलतात, आमदार वेगळे बोलतात, त्यांचा कार्यकर्तेच तर विचारूच नका कारण त्यांनाच कळत नाही उद्धव ठाकरेंसोबत जावा की एकनाथ शिंदे सोबत जावा. शिवसेनेचे पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की लोकांच्या भावना जशा असतील तसं होईल. आत्ताच मागील काही तासापूर्वी ते बोललेत की येथील शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे नुकसान होऊ देणार नाही अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटवून टाकू. या गोष्टीवरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांना म्हणव तुम्ही बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईचा महापौर बंगला हडपलात तेव्हा जनतेचा विचार कुठे गेला होता तुमचा.
शेवटी जाताना राज साहेब म्हटले की माझी सर्व कोकणवासी यांना कळकळीची हात जोडून विनंती करतो की, तुमच्या जमिनी कोणाला विकू नका. कारण इथल्या जमिनी हडपने त्यातून खूप मोठा पैसा कमावणे, हेच स्थानिक लोकप्रतिनिधींच उद्दिष्ट आहे, हे साध्य होऊ देऊ नका. तरी तुम्हाला फसवणारे या लोकप्रतिनिधींना तुम्ही पुढील काळात धडा शिकवा ही विनंती करतो असे मनसेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे म्हटले आहेत......Read more

Comments
Post a Comment