Uddhav Thackeray: हुकूमशाहीने बारसू रिफायनरी प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पेटवू, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
Uddhav Thackeray: हुकूमशाहीने बारसू रिफायनरी प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पेटवू, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा.
कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील सर्व आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या दौऱ्यावर गेले होते. कोकण रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कोकणातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यासाठी गेले असता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे रत्नागिरीत आगमन झाल्यापासून ठिकठिकाणी त्यांचे बॅनर आणि फटाक्यांचा अतिशय बाजीत जोरदार असे स्वागत केले. तसेच यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. बारसू रिफायनरी प्रकल्प हा हुकूमशाहीने करणार असेल, तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पेटवून उठवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्य सरकारला केला आहे.
यावेळी उद्धव ठाकरे बोलले की, मी प्रकल्पासाठी पत्र लिहिले होते ते मला मान्य आहे. त्याबाबत मी तुमची माफी मागतो, परंतु येथील जनतेवर जबरदस्तीने अन्याय करून प्रकल्प करावा असे मी म्हटलो नव्हतो. तसेच हा प्रकल्प सरकारने हुकूमशाहीच्या जोरावर येथील जनतेवर अन्याय होईल अशा प्रकारे हा प्रकल्प लादू नये. जर राज्य सरकारने हुकूमशाहीचा जोरावर हा रिफायनरी प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही सर्व शिवसेना कार्यकर्ते महाराष्ट्र पेटवून उठवू असा आदेश सरकारला दिला आहे. तरी यावेळी सांगितले की हा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको आहे. त्यामुळे कोकण सौंदर्याचा राज होण्यास भाग पाडेल. तरी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला राख आणि गुजरातच्या वाट्याला रांगोळी, असा अन्याय करता, याबाबत आम्ही शांत राहणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही असे स्पष्ट आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. यावेळी ते बोलले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देशात गद्दार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या अगोदर एकनाथ शिंदेंना साधे त्यांच्या जिल्ह्यातील लोकही कोणी ओळखत नव्हती. अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत थेट एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
कातळशिल्पांचीही पाहणी केल्यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्यादरम्यान, बारसू येथील सड्यावर असलेल्या कातळशिल्पांचीही पाहणी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, जसे मी या प्रकल्पाबाबत पत्र दिले होते. तसेच पत्र मी या कातळशिल्पाबाबतही त्यावेळी दिले होते. येथील कातळशिल्पांचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा अशी मागणी मी त्यावेळी केली होती. या कातळशिल्पांबाबत मला या अगोदर माहिती होती. परंतु या रिफायनरी प्रकल्प जागेत ही कातळशिल्प येतात हे मला मुळीच माहीत नव्हते. हा महाराष्ट्रातील अमूल्य असा ठेवा आहे. त्याचं जतन केले पाहिजे तरच आपण आपल्या पुढील पिढीला हे दाखवू शकतो.
उद्धव ठाकरे गटाच्या पाठिंब्यामुळे पुन्हा नव्याने आंदोलन सुरु करणार!
दरम्यान, बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी विरोधातील आंदोलन चार पाच दिवस स्थगित होते. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या पाठिंब्यामुळे येथील ग्रामस्थ पुन्हा नव्याने आंदोलन सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. तरी यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की मी माझ्या कुठल्याही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही. कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तो सहन करणार नाही.......Read more

Comments
Post a Comment