नाशिकसाठी खुशखबर मेट्रो प्रकल्पाबाबत मोठे अपडेट; आता नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे रवाना, 1100 कोटी रुपयांचा होणार खर्च. नाशिक नवीन मेट्रो प्रकल्प: नाशिकरांचा अतिशय महत्वाचा विषय म्हणजे मेट्रो मार्ग प्रकल्प आहे. नाशिकचा या मेट्रो मार्ग प्रकल्पाची घोषणा महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली गेली आहे. नाशिक शहराला दत्तक घेतल्यानंतर फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली गेली होती. नाशिक शहर पहिली एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो निओची घोषणा झाली म्हणून नाशिककरांना मेट्रोचा अनुभव घेता येईल असा आशावाद व्यक्त होत होता. विशेष म्हणजे 2020 मध्ये या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थमंत्री यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद देखील केली होती. यामुळे सदर प्रकल्प लवकरच पूर्ण होईल अशी आशा 2020 मध्ये व्यक्त होत होती. परंतु आता 2023 संपत चालला तरी या निओ मेट्रोमार्ग प्रकल्पाचा नारळ अद्याप फुटलेला नाही. यामुळे या प्रकल्पाबाबत नाशिककरांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्र...