Skip to main content

Posts

Showing posts from May, 2023

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर. अहमदनगर:-             दि. ९ मे रोजी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या सर्व नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील जाहीर करण्यात आलेले पदाधिकाऱ्याचे नाव, पद व कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे आहेत.          कक्ष जिल्हा संघटक अशोक थोरे : ( कोपरगाव / श्रीरामपूर/ नेवासा / राहाता / संगमनेर अकोले / राहुरी), कक्ष जिल्हा कार्यालय चिटणीस : ॲड. राहुल नवले, कक्ष जिल्हा सहसंघटक : प्रमोद कुलट (संगमनेर/अकोले / राहाता), कक्ष जिल्हा सहसंघटक दत्ता कडू ( कोपरगाव / श्रीरामपूर/ नेवासा / राहुरी), कक्ष उपजिल्हा संघटक : मिलिंद न...

PM Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना अटक

PM Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना अटक. पाकिस्तान:-         पाकिस्तान देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज अटक करण्यात आले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या राजधानी इस्लामाबाद येथून अटक करण्यात आले आहे. पाकिस्तान मधील तहरीक-ए-इंसाफ ( पीटीआय ) चे अध्यक्ष तसेच माजी पीएम इमरान खान यांना इस्लामाबाद हाय कोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना का अटक केले गेले आहे?         पाकिस्तान मधील निमलष्करी दलाच्या जवानांनी पंतप्रधान इम्रान खानला घेरले आणि त्याला एका वाहनापर्यंत नेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी इम्रान खानच्या समर्थकांनी ही व्हिडीओ शेअर केला असून, त्याला “ खराब धक्काबुक्की ” करण्यात आल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना अलकादिर ट्रस्ट केसमध्ये अटक केले असल्याचे सांगण्यात आले आहे. पीटीआयचे नेते इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. पीटीआयने इ...

Deepak Kesarkar On Teachers Recruitment: पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती करणार

Deepak Kesarkar On Teachers Recruitment: पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती करणार.         राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, "पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच आधार पडताळणी विद्यार्थ्यांची पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात स्पष्ट आकडा कळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. आज झालेल्या एबीपी माझा शी संवाद यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती सांगितली आहे .          या सदर शिक्षक भरती संदर्भात दीपक केसरकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. तरी नवीन शैक्षणिक वर्ष हे जून मध्ये सुरू होते. तरी पहिल्या टप्प्यात तब्बल 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 20 ह...

तब्बल 3 कोटी 72 लाखाची रोकड हडपसर येथून जप्त.एक व्यक्ती ताब्यात. कर्नाटक इलेक्शन च्या तोंडावर पोलिसांची कारवाई

तब्बल तीन कोटी बहात्तर लाखाची रोकड हडपसर येथून जप्त.एक व्यक्ती ताब्यात. कर्नाटक इलेक्शन च्या तोंडावर पोलिसांची कारवाई.         पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सदर व्यक्ती सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या चार चाकी गाडी मधून प्रवास करत होता. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तब्बल 3 कोटी 72 लाखाची रोकड जप्त करण्यात आली. कर्नाटक इलेक्शनच्या तोंडावर पोलिसांनी कारवाई केली.        कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रशांत धनपाल गांधी हा व्यक्ती आपल्या आपल्या ब्रिजा कार MH 13 सी के 2111 गाडीमधून प्रवास करत होता. पोलिसांना सदर व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पुणे पोलिसांनी त्याच्या गाडीची झडती घेतली असता, त्याच्या गाडीमध्ये असणाऱ्या बॅगमध्ये सदर रक्कम आढळून आली. सदर व्यक्तीकडे चौकशी केली असता आपणही रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितलं. सदर रक्कम ही घेतलेल...

गौतमी पाटीलचा नाच सुरु झाला आणि पत्र्याची शेड खाली कोसळले.

गौतमी पाटीलचा नाच सुरु झाला आणि पत्र्याची शेड खाली कोसळले.          छत्रपती संभाजीनगरमधील वैजापुरातील महालगाव येथे गौतमी पाटीलचा काल कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. कार्यक्रम पाहण्यासाठी काही रसिक पत्र्याच्या शेडवर उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेत होते. अचानक शेड कोसळल्याने जवळपास 50 लोक खाली कोसळले. यात जवळपास 20-25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.       सोशल मीडियावर सध्या प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अपघात झाला आहे. छत्रपती संभाजी नगरमधील वैजापूर या ठिकाणी गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम चालू झाला आणि अचानक एक अनपेक्षित घटना घडली आहे. गौतमी पाटील ही तिचा नृत्यामुळे कायम चर्चेत आहे. परंतु आता सदर छत्रपती संभाजी नगरमधील घटनेमुळे पुन्हा गौतमी पाटील ही चर्चेत आली आहे.      यावेळी छत्रपती संभाजी नगरमधील वैजापूर या ठिकाणी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी...

मणिपूरमध्ये दंगलीच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील २५ विद्यार्थ्यांना विशेष विमानाने मणिपूर इंफाळहून आसामच्या गुवाहाटी येथे आणण्यात आले.

मणिपूरमध्ये दंगलीच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील २५ विद्यार्थ्यांना विशेष विमानाने मणिपूर इंफाळहून आसामच्या गुवाहाटी येथे आणण्यात आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.       मणिपूरमध्ये दंगलीच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील २५ विद्यार्थ्यांना विशेष विमानाने मणिपूर इंफाळहून आसामच्या गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत असे सांगण्यात आले आहे.           मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती .         मणिपूरमध्ये अडकलेल्या 25 विद्यार्थ्यांना विशेष विमानाने महार...

नगर तालुक्यातील जेऊर येथे दगडफेक झाल्यामुळे जेऊर यात्रा उत्सव ला गालबोट लागले आहे.

नगर तालुक्यातील जेऊर येथे काल ग्रामदैवत बायजा माता यात्रा उत्सव दरम्यान दगडफेक झाल्यामुळे जेऊर यात्रा उत्सव ला गालबोट लागले आहे .            नगर तालुक्यातील जेऊर येथे काल ग्रामदैवत बायजा माता यात्रा उत्सव दरम्यान दगडफेक झाल्यामुळे जेऊर यात्रा उत्सव ला गालबोट लागले आहे. समजलेली माहिती अशी आहे की, रहाडगाडग्या मधे बसण्याच्या कारणावरून सायंकाळी दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. संध्याकाळी त्याचे पर्यावसन दंगलीमध्ये झाले होते. (संग्रहित छायाचित्र)             यात्रेमध्ये आलेल्या भाविकांवर देखील दगडफेक झाली तसेच यात्रेमध्ये असलेल्या दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. जवळपास अर्धा तास १०० ते २०० जणांच्या जमावाकडून ही दगडफेक केली जात होती. त्यामुळे गावामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. या दगड फेकी मध्ये अनेक जन जखमी देखील झाले आहेत. यामधील काहींना नगरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.           ग्रामपंचायत कडून दोन्ही क्षेपकावरून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते, तरी देखील दगडफेक थांबली नव्...

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...

Uddhav Thackeray: हुकूमशाहीने बारसू रिफायनरी प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पेटवू, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

Uddhav Thackeray: हुकूमशाहीने बारसू रिफायनरी प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पेटवू, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा.       कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील सर्व आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या दौऱ्यावर गेले होते. कोकण रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कोकणातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यासाठी गेले असता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे रत्नागिरीत आगमन झाल्यापासून ठिकठिकाणी त्यांचे बॅनर आणि फटाक्यांचा अतिशय बाजीत जोरदार असे स्वागत केले. तसेच यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. बारसू रि...

Raj Thackeray: जमिनी कोणाला विकू नका! रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरे यांचे कोकणवासीयांना आवाहन

Raj Thackeray: जमिनी कोणाला विकू नका! रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरे यांचे कोकणवासीयांना आवाहन. कोकण:           सर्व कोकणवासीयांना माझे आवाहन आहे की, जमीन घ्यायला कोणी आले, तर आपली जमीन विकू नका. व्यापारी लोकप्रतिनिधींनी सध्या जमिनींचा पार बाजार उठवला आहे. गरीब जनतेकडून कवडीमोल किमतीत जमीन घेतात आणि सरकारकडून त्या जमिनींचा मोठा मोबदला घेतात. त्यामुळे कोकणवासीयांना सावध राहण्याची गरज असल्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. रत्नागिरीत आयोजित केलेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते.          राज ठाकरे कोकणवासीयांना म्हणाले, बारसू परिसरातील कातळ शिल्पांची नोंद युनेस्कोत आहे. त्यामुळे बारसू येथे प्रकल्प होऊ शकत नाही. या कातळ शिल्प असलेल्या ठिकाणापासून काही किमी पर्यंतची जागा ही वापरता येत नाही. येथील कातळ शिल्प बघायला जगभरातील लोकं येतात, असे ही ते म्हणाले आहेत. कोकणातील जनतेला नेहमी गृहित धरले जाते. मतदान झाल्यानंतर कोणी विचारत नाही. २००७ चा मुंबई-गोवा महामार्गाला आज १५ वर्षे पूर्ण झाली तरी अजून ही रखडला गेला आहे. परंतु समृद्ध...

अहमदनगर येथे गौतमी पाटील चा कार्यक्रमात झाला जोरदार राडा. पोलिसांना करावा लागला लाठी चार्ज.

अहमदनगर येथे गौतमी पाटील चा कार्यक्रमात झाला जोरदार राडा. पोलिसांना करावा लागला  लाठी चार्ज.          आपल्या नृत्य आणि तमाम महाराष्ट्रातील तरुणांना भुरळ घालणार नाव म्हणजे गौतमी पाटील. गावची जत्रा किंवा कोणत्या मोठ्या नेत्याचा बर्थडे असेल तर हमखास घेतल्या जाणाऱ्या नाव म्हणजे गौतमी पाटील. तसेच गौतमी पाटील यांची बैलगाडा मालक प्रेमी म्हणून ही नवी ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच तालुक्यात जिल्ह्यामध्ये तिच्या अदांनी तरुणांना घायाळ केला आहे. प्रत्येक लहान मोठ्यांच्या तोंडी आज तिचं नाव आहे. नाव- गौतमी पाटील जन्मस्थान- शिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र, भारत सध्याचा पत्ता- पुणे व्यवसाय- डान्सर, लावणी राष्ट्रीयत्व- भारतीय धर्म- हिंदू शिक्षण- पदवीधर छंद- संगीत ऐकणे, नृत्य करणे, खरेदी करणे, बागकाम करणे.         आज गौतमी पाटील चा कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चा मध्ये आला आहे.  श्रीगोंदा येथे एका कार्यक्रमानिमित्त गौतम पाटील यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास तरुणांची तुफान गर्दी झाली होती. सदर कार्यक्रम चालू...

द केरळ स्टोरीला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी रुपये??

'द केरळ स्टोरी' ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी रुपये??           सध्या देशभरात जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'द केरळ स्टोरी' आहे. तसेच वादग्रस्त असलेला चित्रपट ही हाच आहे. परंतु काल संपूर्ण देशभरात हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला देशभरातून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. यामुळे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 8.3 करोड रुपये कमावले आहेत. तरी सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे च लागले आहे. सर्व प्रोडूसर्स ला वाटत होते प्रेक्षक चित्रपटावर बहिष्कार टाकतील. परंतु असे काही घडले नाही. मागील सर्व रेकॉर्ड ब्रेक कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटांमध्ये कोणाची भूमिका आहे?         'द केरळ स्टोरी' या चित्रपटामध्ये अदा शर्मा, सोनिया बालानी, योगिता बिहानी आणि सिद्धी इदनानी यांच्या मुख्यतः प्रमुख भूमिका आहेत. तसेच बाकी इतर बॅकअप आर्टिस्ट खूप आहेत. 'द केरळ स्टोरी' कशी घडली?          'द केरळ स्टोरी' हा चित्रपट...

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी अहमदनगर येथे बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी अहमदनगर येथे बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.         आगामी सर्व निवडणुकांमध्ये कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेच्या बळावर विरोधकांना भुईसपाट करणार असल्याचा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला आहे.       या शुक्रवार दि. ५ रोजी नगर तालुक्यातील शेंडी येथे भाजपच्या वतीने बुथ सशक्तिकरण अभियाना संदर्भात निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, अंतू वारुळे यांच्या सह पाथर्डी व नगर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित यावेळी होते. यावेळी पाथर्डी व नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व विजयी झालेल्या संचालकांचा सत्कार ही करण्यात आला आहे.           याप्रसंगी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीप्रमाणे एकजूट दाखविल्यास आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना भुईसपाट करण्यात येईल असे सांगितले. तरी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, खरे...

शरद पवारांची मोठी घोषणा, अध्यक्षपदाचा राजीनामा मागे

शरद पवारांची मोठी घोषणा, अध्यक्षपदाचा राजीनामा मागे            माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही असे म्हणत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं तरी कोणंतही जबाबदारीचं पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.         शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहस्त राजीनामाचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तरी या पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांनी यावेळी सांगितले आहे की, नव्या नेतृत्वासाठी संघटनात्मक बदल करणार आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये नवीन उत्तराधिकारी निर्माण व्हायला हवा, असे ते यावेळी बोलले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामाचा निर्णय मागे घेतो, परंतु कोणते ही जबाबदारी चे पद मी घेणार नाही असेही ते यावेळी बोलले आहेत.         ...

The keral Story रिलिजच्या दिवशी केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये केरळ स्टोरी स्क्रीनिंग रद्द करण्यात आले

The keral Story रिलिजच्या दिवशी केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये केरळ स्टोरी स्क्रीनिंग रद्द करण्यात आले. केरळ स्टोरी स्क्रीनिंग का रद्द करण्यात आली आहे?         द केरळ स्टोरी या वादग्रस्त चित्रपटाचे प्रदर्शन केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये रद्द करण्यात आला आहे. तसेच कोचीमध्ये यापूर्वी सूचीबद्ध केलेले दोन शो रद्द करण्यात आले आहेत. तरी सदर चित्रपटाबाबत कोची मधील सेंटर स्क्वेअर, लुलू मॉल, अशा अनेक कोची मधील थेटर मालकांनी द केरळ स्टोरी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.         तसेच पठाणमथिटा, कन्नूर, वायनाड, कोल्लम आणि एड्डूकी जिल्ह्यातील चित्रपटगृहानी ही चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वादग्रस्त सामाजिक राजकीय गुन्ह्यामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या कथेचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या चित्रपटावर तुम्ही कसे टीका करता? असे थेटर मालकांचे म्हणणे आहे. परंतु तेथील परिस्थिती बघता तेथील थेटर मालकांना चित्रपट प्रदर्शित करणे अवघड झाले आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटांमध्ये कोणाची भूमिका आहे?         केरळ स्टोर...

Manipur Hinsa: दंगाइयों को देखते ही गोली मारने का आदेश, जलते मणिपुर पर एक्शन में Amit Shah

सरकारने दंगल रोखण्यासाठी 'दिसताच गोळ्या घाला' आदेश; 55 लष्करी तुकड्या तैनात, आसाम रायफल्स दाखल. मणिपूर:-        मणिपूर येथील दंगल रोखण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्स तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे मणिपूर मधील परिस्थिती तणावपूर्ण निर्माण झाली आहे.        मणिपूर सरकारने गुरुवारी राज्यातील आदिवासी आणि बहुसंख्य मेईतेई समुदाय यांच्यातील हिंसाचार रोखण्यासाठी "अत्यंत प्रकरणांमध्ये" दृश्यावर गोळी मारण्याचा आदेश जारी केला आहे. मणिपूर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हल्ले, जाळपोळ आणि तोडफोड सुरू आहे. हिंसाचारग्रस्त गावातून  ९०००  हून अधिक लोकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. मणिपूरमध्ये आदिवासी आणि बहुसंख्य मेईतेई समुदायामध्ये उसळलेल्या व्यापक दंगलीला रोखण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सच्या पंचावन्न तुकड्या तैनात कराव्या लागल्या आहेत.          पुन्हा एकदा तेथील परिस्थिती तणावपूर्ण झाल्यास त्यासाठी लष्कराने  १४ स्तंभ तैनात ठेवण्यासाठी स्टँडबाय ठेवण्यात आले आहे, असे तेथील संरक्षण प्रवक्त्याने सांगितले.     ...

अहमदनगर मध्ये धक्कादायक घटना घडली..पत्नीची हत्या करून पतीने घेतला गळफास

अहमदनगर मध्ये धक्कादायक घटना घडली..पत्नीची हत्या करून पतीने घेतला गळफास. अहमदनगर:       अहमदनगर मध्ये धक्कादायक अशी घटना घडली आहे. पत्नीची हत्या करून पतीने राहत्या घरी गळफास घेतला आहे. तरी ही घटना आयकॉन पब्लिक स्कूल जवळ ,शिवनेरी चौक ,स्टेशन रोड येथील घरामध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने अगोदर घरामध्येच त्याचा पत्नीची आत्महत्या केली आहे. तरी आरोपी संदीप रामचंद्र गुजर हे आहेत. संदीप रामचंद्र गुजर यांचे वय 53 वर्ष सांगण्यात आले आहे. त्याचा पत्नी आशा संदीप गुजर ह्या आहेत. त्यांचे हे वय 50 वर्ष होते. त्यांचा कौटुंबिक वादातून दोघांनी आयुष्य संपवल्याचे समजले आहे.         सदर घटनेमध्ये पतीने अगोदर पत्नीचा खून केल्याचे सांगण्यात आले आहे. सदर आरोपी पतीने पत्नीला जीवे ठार मारून नंतर स्वतः घरात गळफास घेतल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी घराचे दरवाजे बंद केले होते. पोलिसांनी दरवाजे तोडून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यानंतर दोन्ही बॉडी सरकारी दवाखाना येथे नेण्यात आल्या आहेत. याबाबत अहमदनगर कोतवाली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सु...

काँग्रेसचे आयटी पार्क साठी अहमदनगर मध्ये उपोषण

काँग्रेसचे आयटी पार्क साठी अहमदनगर मध्ये उपोषण.           स्टॉप मायग्रेशन, वूई वॉन्ट आयटी पार्क, स्टॉप ब्रेन ड्रेन, अशा प्रकारची हातात फलके घेऊन शहर काँग्रेसच्या वतीने एमआयडीसी कार्यालयासमोर आयटी पार्क सुरू करावे या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय उपोषण करण्यात येत आहे. यावेळी काळे म्हणाले की येथे उभारण्यात आलेला आयटी पार्क हा फक्त देखावा असून याचा आपण दीड वर्षापूर्वीच भांडा फोड केला होता. त्यावेळेस माझ्यासह कार्यकर्त्यांवर विनय भंगासारखे खोटे गुन्हे दाखल केले होते. मला वैयक्तिक राजकारणातून संपवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. परंतु विकास साठी रोजगारासाठी उद्योग वाढीसाठी असे कितीही गुन्हे झाले तरी काँग्रेस मागे हटणार नाही असं काळे म्हणाले.   उपोषणामधे त्यांनी कोणत्या मागण्या केल्या आहेत?      आज आपल्या शहरांमध्ये रोजगार हा ज्वलंत प्रश्न असून रोजगार मिळवण्यासाठी कितीतरी तरुण मुंबई पुण्याची वाट धरत आहेत. परंतु यामध्ये बदल झाला पाहिजे शहरांमध्ये नवीन रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत आपल्या शहरातील स्थलांतर...

भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मीरच्या चिनाब नदीत कोसळले; युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे

भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मीरच्या चिनाब नदीत कोसळले; युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.            जम्मू-काश्मीर मध्ये किश्तवाडा येथे आपल्या भारतीय लष्कराचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सदर हेलिकॉप्टर मध्ये लष्कराचे तीन अधिकारी होते. चिनाब नदीत हेलिकॉप्टर कोसळले असून, तेथे बचाव कार्य लष्कराने सुरू करण्यात आले आहे.       सदर घटना जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात जीवित हानी झाली नाही. परंतु, चिनाब नदीत हेलिकॉप्टर कोसळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्या परिसरातील खराब वातावरना मुळे हा अपघात झाल्याचे लष्कराकडून सांगितले गेले आहे.        ज्या किश्तावाडा परिसरात ह्या हेलिकॉप्टरची दुर्घटना झालीय, तो परिसर अत्यंत दुर्गम परिसर असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. सदर दुर्गम भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. या हेलिकॉप्टरमधून भारतीय लष्कराचे तीन अधिकारी जात होते. हे हेलिकॉप्टर पाऊस आणि खराब हवामानामुळे क्रॅश झाले आहे. या सर्व अधिकाऱ्यांचे काय झाले? याची काहीच माहिती सुरुवातील...

कलेक्टर ऑफिसातील सर्व AC बंद होणार, बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचा अनोखा निर्णय.

कलेक्टर ऑफिसातील सर्व AC बंद होणार, बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचा अनोखा निर्णय.           बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे कलेक्टर ऑफिसमधील कोणत्याच डिपार्टमेंटमध्ये एसी लावला जाणार नाही, असा अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. हा आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर अधिकाऱ्यांसह जिल्ह्यात ही चर्चेला उधाण आले आहे.        दीपा मुधोळ जिल्हाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्याचा चार्ज घेतल्यानंतर हा पहिला निर्णय त्यांनी स्वतःच्या केबिनपासून सुरु केला गेला आहे. हा निर्णय म्हणजे केबिनमध्ये कसल्या ही पद्धतीने एसी ची हवा नको आहे. तरी त्यांच्या केबिन मधील दरवाजे खिडक्या नेहमी उघड्या असायला पाहिजेत. त्यानंतर या पुढील काळात व्हीआयपी गाडीला ही एसी नसावा असे त्या बोलल्या आहेत. त्या एसी गाडीच्या काचा ही उघड्याच असाव्यात.      त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असलेला एसी बंद करण्यात यावा असे ही त्यांनी सांगितले आहे. तरी य...

राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निर्णय होणार ५ मे ला. याबाबत काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निर्णय होणार ५ मे ला. याबाबत काय म्हणाले शरद पवार?       राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निर्णय येत्या ५ मे होणार आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदा संबंधी समितीचा जो निर्णय होईल तो मला मान्य अशी शरद पवारांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.         राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देताना, मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे शरद पवार बोलले आहेत. अध्यक्ष पदासाठी जी आपण समिती नेमली गेली आहे, त्यांनी ५ मे रोजी बैठक घ्यावी असे त्यांनी सांगितले आहे. तसेच जो समिती निर्णय घेईल, तो आपल्या सर्वांना मान्य असेल असे ही ते यावेळी बोलले आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांची ही पहिलीच प्रतिक्रिया आली आहे.         सदर समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पीसी चाको, नरहरी झिरवाळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, ...

आता अहमदनगरमध्ये होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक:- अहमदनगर महापालिका प्रशासन

आता अहमदनगरमध्ये होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक:- अहमदनगर महापालिका प्रशासन          अनेक वर्षापासून प्रोफेसर कॉलनी चौक येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचे रखडले होते. तरी आज छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज अहमदनगर महापालिकेतर्फे स्थायी समितीच्या सभेत निविदा प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे येत्या १४ मे रोजी होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम खर्चाला ही मान्यता दिली गेली आहे.           छत्रपती संभाजी महाराज यांचा १२ फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. यावेळी स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे बोलले, की प्रोफेसर चौक येथे १८ फुटी चबुतरा बांधण्यात येणार आहे आणि त्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा १२ फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी स्मारक सुशोभी करणाचे काम ही काम ही केले जाणार आहे. यापूर्वी माजी नगराध्यक्ष कै. सुरेश शेळके यांनी नेप्ती नाका येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे ठरविले होते. त्यानुसार कामालाही सुरूवात करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय अडचण...

काँग्रेसचे पक्षनेते राहुल गांधी यांना जेलमध्ये जावं लागणार? गुजरात हायकोर्टाचा नेमका निकाल काय?

काँग्रेसचे पक्षनेते राहुल गांधी यांना जेलमध्ये जावं लागणार? गुजरात हायकोर्टाचा नेमका निकाल काय?         काँग्रेसचे पक्षनेते राहुल गांधी यांनी न्यायालयात केलेल्या अपील मध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. सदर याचिका ही सत्र न्यायालयात फेटाळली गेली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील देखील केले होते. यावर अपीलवर आज सुनावणी पूर्ण झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अपिलावर गुजरात उच्च न्यायालयात आज सुनावणी पूर्ण झाली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. विशेष म्हणजे गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला आहे. सदर गुजरात न्यायालयाचा निर्णय हा आता न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुरत येथील न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती द्यावी ही याचिका सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केले गेले होते. त्यावर आज सुनावणीला पूर्ण झाली आहे.       ...

नाना पटोलेंचे मोठे वक्तव्य शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार?

नाना पटोलेंचे मोठे वक्तव्य शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार?        राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार? असे पवारांच्या राजीनाम्यानंतर दुसऱ्याच दिवशी पटोलेंचं मोठं वक्तव्य केले आहे. नाना पटोलेंची प्रतिक्रिया  राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. यावर आता नाना पटोलेंनी सूचक विधान देखील केले आहे.   मुंबई :    २ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी शरद पवार यांच्या लोक माझे सांगती. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तक सोहळ्यातच शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. पवारांचा हा निर्णय जसा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का मानला जात आहे. तसाच तो मविआच्या इतर घटक पक्षांसाठी देखील धक्कादायक आहे. पवारांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे अध्यक्ष नाना पोटले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत नाना पटोले:        मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये वेगवान घडा...

राज्यात दादा, केंद्रात ताई सुप्रिया सुळे यांचं नाव अध्यक्षपदासाठी जवळजवळ फायनल

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पद ठरलं? राज्यात दादा, केंद्रात ताई सुप्रिया सुळे यांचं नाव अध्यक्षपदासाठी जवळजवळ फायनल..          राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खाजदार सुप्रिया सुळे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केंद्रात ताई आणि राज्यात दादा या धोरणानुसार सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.         राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा. शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांच्या उत्तराधिकारी कोण होणार? असा प्रश्न केला जात आहे. या स्पर्धेत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील या तीन नेत्यांची नावे समोर आहेत. मात्र, या सर्वांमध्ये सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. खाजदार सुप्रिया सुळे याच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाच्या नव्या अध्यक्ष होणार असल्याचं सांगितले जात आहे. असे संकेत मिळत आहेत.         त्यामुळे खाजदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या पहिल्या महि...

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ई-फाईलिंग आणि सुविधा केंद्रांचे वितरण. तसेच महाराष्ट्र राज्यातील न्यायालयाचे कामकाज मराठी भाषेतून

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ई-फाईलिंग आणि सुविधा केंद्रांचे वितरण. तसेच महाराष्ट्र राज्यातील न्यायालयाचे कामकाज मराठी भाषेतून.        महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ई-फाईलिंग आणि सुविधा केंद्रांचे वितरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले आहे.         न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बार कौन्सिलची ई-फाईलिंग सुविधा उपयुक्त ठरेल असे यावेळी सांगण्यात आले आहे. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील न्यायालयाचे कामकाज मराठी भाषेतून करण्याबाबत केंद्र सरकारने विचार करावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.       आपल्या देशातील न्याय व्यवस्थेच्या आधुनिकी करणासाठी अर्थसंकल्पात सात हजार कोटींची तरतूद केली गेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून न्यायालयांमध्ये भारतीय भाषांचा वापर वाढ...

गौतमी पाटील चा व्हिडिओ व्हायरल करणारा तो सापडला..

अत्यंत कमी कालावधीमध्ये नृत्यां मध्ये शिखरावर पोहोचलेलं नाव म्हणजे गौतम पाटील.          आपल्या नृत्य आणि तमाम महाराष्ट्रातील तरुणांना भुरळ घालणार नाव गौतमी पाटील. गावची जत्रा किंवा कोणत्या मोठ्या नेत्याचा बर्थडे असेल तर हमखास घेतल्या जाणाऱ्या नाव म्हणजे गौतमी पाटील. महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच तालुक्यात जिल्ह्यामध्ये तिच्या अदांनी तरुणांना घायाळ केला आहे. प्रत्येक लहान मोठ्यांच्या तोंडी आज तिचं नाव आहे. नाव- गौतमी पाटील जन्मस्थान- शिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र, भारत सध्याचा पत्ता- पुणे व्यवसाय- डान्सर, लावणी राष्ट्रीयत्व- भारतीय धर्म- हिंदू शिक्षण- पदवीधर छंद- संगीत ऐकणे, नृत्य करणे, खरेदी करणे, बागकाम करणे.        आजकाल एक वाक्य ट्रेंड करत आहे ते म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील. या वाक्य प्रमाणात महाराष्ट्र खूप प्रसिद्ध झाली आहे. तिने आपल्या नृत्यने तमाम तरुणाईला वेगळीच भरून घातली आहे. परंतु काही दिवसापूर्वी ती एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली होती.          त्याचं कारण म्हणजे तिचा व्हायरल झालेला व्हिडिओ ....

राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा

राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा:-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण         महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी खारघर येथे झालेली, घटना हे सरकारी हत्याकांड असून, अजूनही याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला नाही. तरी सदर घटनेला आपल्या सरकारचे ढिसाळ नियोजनच जबाबदार दिसत आहेत. या खारघर घटनेची हायकोर्टाच्या न्यायाधिश यांचामार्फत चौकशी केली गेली पाहिजे. तसेच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांना तातडीने मदत दिली गेली पाहिजे. तसेच बारसु येथील रिफायनरी प्रकल्पसाठी स्थानिकांचा जबरदस्त विरोध असताना, सध्याचे सरकार हे जबरदस्तीने रेटत आहे. या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे, यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, अशा सर्व मागण्या राज्यपाल यांच्याकडे केल्या आहेत.          महाराष्ट्रातील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल श्री. रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली आहे. या सदर शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री व प्रदेश कार...