नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्याने वेड्याबाभळीने वेढलेल्या व पायवाट असलेल्या परिसराचा कायापालट आ.संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते
नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्याने वेड्याबाभळीने वेढलेल्या व पायवाट असलेल्या परिसराचा कायापालट आ.संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा. बोल्हेगाव मधील साळवे नगर, नवनाथ नगर अंतर्गत रोड चे कॉक्रेटीकरण तसेच गटार लाईन काम पूर्ण करण्यात आले. या कामाचा आज लोकार्पण सोहळा होता. हा सोहळा आमदार संग्राम जगताप यांचा हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व गावकऱ्यांनी फटाक्यांचा अतिशय बाजित नगरसेवक कुमारसिंह वाकळे आणि आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत केले आहे. तसेच सर्व गावकऱ्यांनी "कुमार भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है " आणि "राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो" या घोषणा देत गावकऱ्यांनी आनंद यावेळी व्यक्त केला. नगरसेवक वाकळे यांनी प्रभागातील बारकाईने अभ्यास करून विकास कामे मार्गी लावले. महापालिकेत त्यांना स्थायी सभापती पदाची संधी मिळाल्याने त्यांनी या भागातील चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले आहे. विकासाचे व्हिजन असलेल्या नगरसेवकांकडून प्रभागातील कामे मार्गी लावण्यात येतात. याच कामाचे मूल्यमापन करून...